Thursday, September 2, 2010

Nava-kaavya!!

Please scroll down for hindi translation

कधीतरी कुठल्यातरी वृत्तपत्रात आलेल्या एका सर्वांगसुंदर लेखातील काही उतारे -

साक्षरता - शिक्षण - प्रसारमाध्यमे यांच्या प्रसारामुळे काव्य सुधारले नाही; प्रकाशनाचा हव्यास तेवढा वाढला.

’काव्य’ आणखी काय वाटेल ते असेल; पण ती ’कला’ तर आहेच ना? ’कला’ म्हटली की तिथे तंत्र आणि परंपरा हे घटक आलेच. ते नाकारायचे म्हटले तरी त्यासाठीही त्यांचे ज्ञान-भान हवेच; परंपरा-तंत्र यांच्याविरुद्ध बंडखोरी करायची म्हटली तरी तेवढ्यासाठीही त्यांचे आकलन हवेच. छंदाला विरोध म्हणून छंदमुक्त लिहिणे आणि छंदाच्या अज्ञानाने छंदोभंग करणे या दोहोंत फरक आहेच.

कला म्हटली की रियाझही आलाच. किशोरीताईंनी रियाझ, साधना, तप इत्यादी संकल्पनांतील भेद उत्तम उकलून दाखविला आहे; तो भारतीय अध्यात्माशी सुसंगत आहे. रियाझ म्हणजे तंत्रावर प्रभुत्व मिळविण्याचा अभ्यास; साधना म्हणजे कलेवर प्रभुत्व मिळविण्याचा ध्यास; आणि तप म्हणजे सर्व जीवनच कलेला समर्पित करण्याचा क्रतू.

कला ही आकाशातून भुईवर उअतरणारी आकाशीची वीज आहे; तुम्ही खडकासारखे खंबीर रहा; ती तुमच्यावर कोसळेल; तुमच्यातून जीवनधारा झुळझुळ वाहू लागतील; भोवतीच्या जीवनाला जाऊन मिळतील - तिथे कला आणि जीवन अभिन्नच असतील. ’वोहळें हेंचि करावें। जें गंगेचे आंग ठाकावें॥’

हे नागमोडी आकाशपुष्प माथ्यावर माळण्याचे बळ आपल्यात कुठले? ते सोडा - पण रियाझ तर शक्य आहे? कविता करा नं जितक्या करायच्या तितक्या - कोण नाही म्हणतंय - पण त्या प्रकाशित करण्याची एवढी असोशी कशाला? असे किती वाचक तुमची कविता वाचतात? वाखाणतात? उगीच काहीतरी. कविता करतो एक, वाचतो दुसरा आणि पत्र तिसऱ्याला. असेच काही दिवसांपूर्वी एका मित्राचे एक खमंग पत्र आले :

" हे आजकालचे कवी आपल्या अत्यंत खाजगी दुःखांना, भावनांना कवितेच्या रूपात ’पाडतात’... कविता तर प्रत्येकाच्याच मनात भुणभुणत असते... पण म्हणून काय एकदम भड्‍कन कविता ’पाडायची’? त्या कवितेचाही मनात रियाझ झाला पाहिजे. ती गाळल्या गेली पाहिजे, तावल्या गेली पाहिजे; त्यानंतरच ती कागदावर उतरवली गेली पाहिजे. एवढे झाल्यावर, माझी ही कविता वाचकांनी का वाचावी, असा प्रश्न प्रत्येक कवीने स्वतःच्या मनाला वारंवार विचारला पाहिजे. आपल्या कवितेने आपण वाचकांना कायदेणार आहोत, याचाही विचार कवीने करावा असे वाटते. आली उबळ की केली कविता ही प्रवृत्ती थांबावयास हवी. ’नवकाव्या’ने या कवींची फारच सोय केली आहे. महर्षी वाल्मीकिंना पण वेदना झाली होती; ज्ञानदेवपण दुःखात होरपळून गेले होते. त्यांनी कधी आपल्या दुःखाचा टाहो फॊडला नाही... उलट आम्हाला अमृत दिले.

आजकालच्या कवींचे नवनवीन शब्द मला गोंधळात टाकतात. ’गर्भनिळे आभाळ’ यचा काय अर्थ घ्यावा?... ’ज्यांचा चेहरा चिणलेल्या तळघरातही नेहमी उत्सवगर्भच राहतो’ ही *** **** कविता. हे असनारे! तू कवी अस ना रे! पण त्याची सजा आम्हाला का? मला वाटते, आजकालच्या मुक्त आणि वैध गर्भपातामुळे या कवींना ’गर्भ’ शब्द मुबलक मिळत असावा!"


’वाङ्मयीन महात्मता’ या समीक्षालेखातील उतारे

वाङ्मयीन तादात्म्याची प्राथमिक पात्रताच मरठी लेखकांत फारशी दिसत नाही आणि ज्यांच्यात आहे त्यांना लिहिण्याची घाई इतकी असते, जणू काही त्यांना अभ्यासाने काही फायदा होतो ही कल्पनाच नसते. प्राथमिक पात्रता ही ईश्वरदत्त देणगी आहे पण अभ्यासाने तिचे संगोपन करणे हे लेखकाचे कर्तव्य आहे. प्रत्येकालाच प्रत्येक क्षणाला वाल्मीकि होता येत नाही. मराठी वाङ्मयाच्या हिणकसपणाचे एक कारण जरी लेखकांच्या जीवनानुभवक्षेत्राचा संकुचितपणा हे आहे असे गृहीत धरले, तरी त्यापेक्षा अधिक हानिकारक कारण म्हण्जे जे जीवनानुभव आहेत त्यांचेही अपुरे आकलन, तादात्म्यहीन परीक्षण हे आहे. जेथे कोठल्या ना कोठल्या मासिकात आपली गोष्ट दर महिन्याला प्रसिद्ध झालीच पाहिजे हा आग्रह, तेथे यथार्थ तादात्म्याची आशा कशी करता येईल? जेथे आज काय वर्गकलहचित्रणाची टूम आहे ना, मार्क्सवादी मजूरजीवनाच्या चित्रणाची प्रथा आहे ना, बेताल, अनिर्बंध स्त्री-पुरुष संबंधाच्या कवितांतच क्रांतिकारक साम्यवादाची किंवा पुढारलेल्या सुसंस्कृतपणाची इतिकर्तव्यता आहे ना, लिहा तर तसले वाङ्मय ही प्रेरणा, तेथे क्षणभर दम धरून मार्क्सवाद, वर्गकलह, साम्यवाद या शब्दसमुच्चयांत दडलेल्या गहन विचारसरणीचे परिशीलन करून, त्या विचारसरणीशी खरोखर समरस होऊन, मग लिखाणाला प्रवृत्त होण्याची यातायात कोण करतो?

________________________________________________________________

Hindi Translation

Excerpts from a newspaper article (translated):

साक्षरता-शिक्षा-प्रसारमाध्यमों के विस्तार से काव्य का स्तर तो ऊंचा नहीं हुआ है; प्रकाशन की होड जरूर लग गई।

’काव्य’ और जो कुछ भी हो; कला तो अवश्य है ना? जहाँ कला है वहाँ तंत्र और परंपरा भी हैं। उन्हें नकारने के लिये भी उनका ज्ञान-भान होना जरूरी है; उनके विरुद्ध विद्रोह भी करना है तो विरोध कर पाने के लिये भी उनका आकलन होना चाहिये। छंद से विद्रोह करने के लिये छंद-मुक्त काव्य करना और छंद के अज्ञान से छंदोभंग करना दोनों अलग बातें हैं।

कला है तो रियाझ भी है। किशोरीजी ने रियाझ, साधना, तप जैसी संकल्पनाओं का भेद बखूबी समझाया है; वह भारतीय अध्यात्म से भी सुसंगत है। तंत्र पर प्रभुत्व पाने का अभ्यास है रियाझ; कला पर प्रभुत्व पाने का निदिध्यास है साधना; और संपूर्ण जीवन ही कला को समर्पित कर देने का क्रतु है तप।

कला तो भूमि पर उतरनेवाली आकाशवासिनी विद्युत् है; आप पाषाण की तरह अडिग रहिये; वह आप पर गिरेगी, आप में से जीवन सहज ही बहने लगेगा; आसपास के जीवन से जा मिलेगा - वहाँ कला और जीवन में अभेद हो जाएगा। ’वोहळें हेंचि करावें। जें गंगेचे आंग ठाकावें॥’ (पानी की धारा गंगा से ही जाकर मिलती है।)

यह कुण्डलित आकाशपुष्प माथे पर सजाने पाने का बल हममें आजकल है कहाँ! उसे छोडिये, पर रियाझ तो कर सकते हैं? कविताएँ जितनीं चाहें रच डालिये - कौन मना करता है - पर उनके प्रकाशन की इतनी ललक क्यों? ऐसे कितने लोग आपकी कविताओं को पढते हैं? पसंद करते हैं? बेकार ही! कविता रचे कोई एक, पढे कोई दूसरा, और खत किसी तीसरे को। ऐसे ही एक मित्र का जायकेदार पत्र प्राप्त हुआ:

"यह आज के कवि अपनी अत्यंत व्यक्तिगत भावनाओं को कविता के रूप में ढालते हैं... कविता तो सभी के मन में गुनगुनाती रहती है... तो क्या इसलिए एकदम से कविता को ढाल ही दें? उस कविता का भी मन में रियाझ हो। वह छने, तपे; उसके बाद ही कागज पर उतरे। इतना होने पर, मेरी यह कविता लोग क्यों पढें, यह प्रश्न हर कवि अपने आप से पूछे। मेरी कविता से मैं पाठकों को क्या दे रहा हूँ, इसका विचार भी कवि करें ऐसा लगता है। मन किया और रची कविता, यह वृत्ति अवरुद्ध होनी चाहिये। ’नवकाव्य’ ने कविओं को बडी सुलभता प्रदान कर दी है। महर्षि वाल्मीकि भी वेदनाग्रस्त हुए थे; ज्ञानदेव भी दुःख में तपे थे। उन्होंने कभी अपने दुःख का आक्रोश नहीं किया... अपितु हमें अमृत दिया।

आजकल के कविओं के नित्यनवीन शब्द मुझे संभ्रमित कर देते हैं। ’गर्भनिळे आभाळ’ (गर्भनील आकाश) इसका क्या अर्थ लगाएँ? ........... मुझे लगता है आजकल के मुक्त और वैध गर्भपात की वजह से इन कविओं को ’गर्भ’ शब्द भरपूर मिलता होगा।"

’वाङ्मयीन महात्मता’ समीक्षालेख से उद्धृत (अनुवादित)

वाङ्मयीन तादात्म्य की प्राथमिक पात्रता ही लेखकों में ज्यादा दिखाई नहीं देती, और जिनमें है उन्हें लिखने की इतनी जल्दबाजी है मानो अभ्यास से कुछ लाभ होता है इसकी उन्हें कल्पना तक नहीं। प्राथमिक पात्रता तो ईश्वरी देन है, परंतु उसका अभ्यास से संगोपन करना लेखक का कर्तव्य है। हर कोई हर क्षण में वाल्मीकि नहीं बन सकता। वाङ्मय के निकृष्ट स्तर का एक कारण यद्यपि लेखकों के जीवनानुभवक्षेत्र की संकुचितता है, तथापि उससे भी हानिकारक कारण है विद्यमान जीवनानुभवों का अपूर्ण आकलन, तादात्म्यहीन परीक्षण। जहाँ किसी न किसी पत्रिका में हर महीने मेरी कथा प्रकाशित होनी ही चाहिये यह आग्रह, वहाँ यथार्थ तादात्म्य की अपेक्षा कैसे रख सकते हैं? जहाँ - आज क्या वर्गकलहचित्रण का जोर है, मार्क्सवादी मजदूरजीवन के वर्णन की प्रथा है, बेताल, अनिर्बंध स्त्री-पुरुष संबंधों पर आधारित काव्य में ही क्रांतिकारी साम्यवाद की अथवा पुरोगामि संस्कृति की इतिकर्तव्यता है, तो रचते चलो वैसा ही वाङ्मय - यह प्रेरणा, वहाँ कुछ क्षण रुककर मार्क्सवाद, वर्गकलह, साम्यवाद इन शब्दसमुच्चयों में निहित गहन विचारधारा का परिशीलन करके, उस विचारधारा से वास्तव में समरस होकर, फिर रचना के लिये प्रवृत्त होने का कष्ट कौन उठाएगा?"

No comments: